राजेवाडी प्रीमियर लीग पर्व 4.
(Pune)आंबेगाव तालुक्यातील राजेवाडी गावात आदिवासी भागत खेळाडूना वाव मिळण्यासाठी ही लीग आयोजित केली जाते. खूप नियोजनबद्ध ही लीग असते. महत्वाचे म्हणजे हे लीग 4 थ वर्ष आहे. आणि ह्या लीगमध्ये प्रमुख्याने लिलाव पद्धतीने खेळाडू घेतले जातात. ह्या लीगचे संपूर्ण नियोजन हे राजेवाडी गावचे ग्रामस्थ आणि राजेवाडीचे खेळाडू नियोजन करतात. खूप चांगल्या प्रकारचे नियोजन ह्या लीगमध्ये असते. ह्याही वर्षी अत्यंत छंगल्या प्रकारे आरपीएल 4 चे नियोजन केले त्यामध्ये प्लेअर ऑक्शन पासून ते यूट्यूब लाइव जसे आयपीएलचे नियोजन असते त्याप्रकारे नियोजन इथे बघण्याला मिळाले. खेळाडूनी न ह्याचा खूप उत्साह आणि आनंद घेतला.
आकर्षक आशा भेटवस्तुआणि ट्रॉफी ह्या मध्ये होत्या, पहिल्या नंबरसाठी ४१,००० रुपये आणि एक भव्य ट्रॉफी, ज्यामध्ये आदिवासी दैवत राघोजी भांगरे ची फ्रेम फोटो,दुसऱ्या नंबरसाठी ३१,००० रुपये आणि एक भव्य ट्रॉफी, तिसर्या नंबरसाठी २१,००० रुपये आणि एक ट्रॉफी, चौथ्या नंबरसाठी १७,००० रुपये आणि एक ट्रॉफी. तसेच मोठ्या प्रमाणात वैयक्तिक भेटी होत्या. ज्यात मॅन ऑफ द सिरिज साठी टीव्ही, स्पोर्ट्स शूज, बॅट आणि इतर बक्षीसे होती. मुख्यतः आरपीएलमध्ये १२ टीम ने भाग घेतात, त्यांमध्ये शिवशंभू राजेवाडी,निगडाळे, कुशिरे,शिनोलि,तेेरुंगन,आम्बेदरा, माळीन ,ढगेवाडी, पिंगलवाडी,ग्रामपंचायत पाटण म्हाळुगे,हरिनमाळ, मुख्य आरक्षण टीम चे आयकॉन खेळाडू होते. हे सर्व मॅच लाईव्ह प्रसारित केले होते त्यांमध्ये आपण यूट्यूब वर शिव लाईव्ह या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकत होता. खूप छान आणि सुंदर असा आयोजन त्या स्पर्धा मध्ये केला होता. त्यामध्ये ६ दिवसांचा आयोजन होता. पहिल्या दिवशी ४ टीम, दुसऱ्या दिवशी ४ टीम आणि तिसऱ्या दिवशी ४ टीम होत्या, त्यांमध्ये प्रत्येक दिवशी २ टीम ने सुपर ८ मध्ये प्रवेश केलाआणि उर्वरित टीम कॉल बॅकमध्ये. आणि नंतर सुपर ८ मधून सुपर ४ टीम निवडल्या.
फाइनल राउंडमध्ये ४ टीम होत्या, त्यामध्ये अंबेदरा टीम, पिंगळवाडी टीम, शिवशंभो राजेवाडी टीम आणि कळबई टीम होत्या. त्यांमध्ये पॉईंट टेबलच्या नुसार टीम होत्या. त्यामध्ये फाइनलमध्ये जाऊन पोचल्या त्या पिंगळवाडी आणि कलंबई टीम. खूप खतरनाक अश्या ह्या टीम होत्या.शेवटच्या दिवशी ह्या सर्व थरारक मैच च आनंद घेता आला. . फाइनल मॅच ५ ओव्हरचा खेळ खेळला गेला, ज्यात कळबई संघने ५५ धावा केल्या आणि पिंगळवाडी संघाला हे लक्ष दिले,परंतु पिंगळ वाडी संघ पहिल्या 2 ओवर मधे नाजुक स्तिथि मधे होता कारण त्यांचा महत्वाचा फलंदाज SP बाद झाला होता.परंतु ABD सारखा चौफेर मारा करणारा Jr ABD अवि भवारी मैदानात होता त्याने शेवटच्या ओवर मध्ये सलग तिन सिक्स मारून विजय खेचून आणला.सम्पूर्ण टीम ने खुप चांगला खेल दाखवला व् विजय मिळवला.
आरपीएल पर्व 4 मध्ये असे खूप तारे सितारे बघायला मिळाले, त्यामध्ये एसपी स्वप्नील पारधी, रवी घोइरत, योगेश पारधी, दत्ता गिरंगे, दत्ता भवारी, नीलेश डोळस,योगेश वाजे, व्दीपक साबळे, अरुण कोंढवाले, अजय मोहरे, अक्षय ठुबल, गणेश कोकणे, ह्यासारखे नामवंत खेळाडू आपल्याला बघायला मिळाले. त्यामध्ये एक चमकनारा सितारा सर्वांचे लक्ष वेधुन घेणारा अष्टपैलू खेळाडू रवी घोइरट याने विस्फोटक फलंदाजी करुन् सर्वांची लक्ष वेधले. फलंदाजीमध्ये तर त्यांनी जवळजवळ ४०० च्या स्ट्राइक रेटने रन्स केले.आणि त्यामुळेच तो,
मॅन ऑफ द सीरीजचा मानकारी पण ठरला. (आकर्षक LED टीव्ही). आणि सन्मान चिन्ह
नीलेश डोळस
उत्कृष्ट गोलंदाज – स्पोर्ट शूज च मानकरी
उत्कृष्ट फलंदाज-अजिंक्य भेके
एक बैट
फायनल-
मन ऑफ़ द मैच -ABD अवि भवारी
पहिल्या नंबरसाठी ४१,००० रुपये आणि एक भव्य ट्रॉफी, ज्यामध्ये आदिवासी दैवत राघोजी भांगरे ची फ्रेम फोटो
दुसऱ्या नंबरसाठी ३१,००० रुपये आणि एक भव्य ट्रॉफी.
तिसर्या नंबरसाठी २१,००० रुपये आणि एक ट्रॉफी.
चौथ्या नंबरसाठी १७,००० रुपये आणि एक ट्रॉफी.
अशी आकर्षक बक्षीसें ह्यामध्ये होती, खूप चांगले नियोजन ह्यामध्ये बघायला मिळले. फायनल सामना झाल्यानंतर ग्रामस्थानी पण खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील कामगिरिसाठी शुभेच्छा दिल्या.ग्रामस्थानी एक इच्छा व्यक्त केलि की इथून काही खेळाडू रणजी किंवा इतर राष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएल सारख्या स्पर्धांमध्ये त्यांची निवड व्हावी खूप छान मार्गदर्शन ग्रामस्थानी केले, त्यामध्ये त्यांनी सर्व ग्राउंडस्टाफचे, मंडप डेकोरेटर, अंपायर, कॉमेंटेटर सर्वांचे आभार मानले. इथून पुढे ह्यपेक्षाही चांगली लीग भरवु असे आश्वासन दिले.